breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यात पबचा हप्ता दोन लाखांपर्यंत; रवींद्र धंगेकरांनी अधिकाऱ्यासमोर वाचली वसुलीची यादी

पुणे | पुणे शहरातील पब संस्कृती पोलिसांच्या आशीर्वादामुळे सुरु आहे. या प्रकरणात कोणत्या पबकडून किती हप्ते घेतले जात आहे, त्याची यादी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांसमोर आंदोलन केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ही हप्त्यांची यादी सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी वाचली. येत्या ४८ तासांत बेकायदेशीर पबवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाला. सुमारे तासभर ते पुणे शहरात अवैध सुरु असलेल्या पबसंदर्भात जाब विचारत होते. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पब सुरु आहे. परंतु त्याच्यावर हप्तेवसुलीमुळे कारवाई होत नाही. आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला बेकायदेशी सुरु असलेले पब दाखवतो, असे त्यांनी म्हटले. तसेच कोणत्या पबकडून महिन्याला किती वसुली होती, त्याची यादी पुन्हा वाचून दाखवली.

हेही वाचा     –    ‘वेदांतच्या रक्ताचा नमुना कचऱ्याच्या डब्यात टाकला’; पोलीस आयुक्तांचा मोठा गौप्यस्फोट 

हप्ते वसुलीचा आरोप चुकीचा आहे, असा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनी केला. शहरात कुठे बेकायदेशीर बार तर आपण चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. पब, बार, हॉटेल मालकावर गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गुन्हे दाखल झाले आहेत. या वर्षी १७ परवाने निलंबित करण्यात आले आहे. वर्षभरात १०० पेक्षा जास्त बारवर कारवाई करण्यात आली आहे. दोन परवाने कायमस्वरुपी बंद केले आहे. पुण्यातील ५४ बार सील केले आहेत, असे राजपूत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button