मंदिरांचे दरवाजे उघडले..! आकुर्डीतील खंडोबा मंदिरात मनसेच्यावतीने महाआरती
पिंपरी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे अखेर महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे उघडले असल्याचे मत मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. त्यानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने खंडोबा मंदिर, आकुर्डी या ठिकाणी महाआरती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत भाऊ डांगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत (बाळा) दानवले,चिंचवड विभाग अध्यक्ष मयूरभाऊ चिंचवडे,पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष सुशांत साळवी, सचिन मिरपगार, सुरेश सकट, विष्णू चावरीया, विनोद भंडारी, राजू येवते, निलेश ननावरे, तुकाराम शिंदे, के के कांबळे, निलेश कांबळे, रोहन कांबळे, देवेंद्र निकम, सागर सोनटक्के, नारायण पठारे, संजय मोरे, विक्रम सोरटे, प्रफुल्ल कसबे, किसन हांडे, पप्पू शिंदे, मंगेश गायकवाड तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावेळी मंदिर आणि प्रवेशव्दारावर भंडाराची उधळण करत, येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषणा देण्यात आल्या.