breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नागपूर मेट्रोचे अतिरिक्त रुळ पुण्यात बसविणार 

  • पिंपरीपासून साडेचार किमी अंतर उन्नत मार्ग पुर्ण 
  • काम पुर्ण झालेल्या ठिकाणी पुणे मेट्रोकडून लवकरच रुळ टाकणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  नागपूर येथील मेट्रोचे शिल्लक राहिलेले रेल्वे रुळ पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मागविण्यात आले आहेत. ते रुळ पिंपरी ते स्वारगेट मेट्रो प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोचा साडेचार किमी उन्नत मार्ग सध्या पुर्ण झालेला असून त्या ठिकाणी रुळ टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. 

पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रो रेल्वे सुरु करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे.  त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे रूळ टाकण्याचे काम
सुरु होणार आहे. वेळेची बचत व्हावी, त्याकरिता नागपूरमधील अतिरिक्त रेल्वे रूळ हे पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मागविण्यात येत आहेत. पुणे मेट्रोचा ४.५ किमी उन्नत मार्ग पूर्ण झालेला आहे. तेथे हे रूळ टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.

रेल्वे रूळ घेऊन आज (शुक्रवारी) पुण्यात लॉरी दाखल झाली असून ते रूळ खराळवाडी (PCMC) येथे उतरवण्यात आले. पुणे मेट्रो UIC ६० E १, १०८० ग्रेड, हेड हार्डन याप्रकारचे रेल्वे रूळ वापरणार आहे.  महामेट्रोसाठी रेल्वे रूळ १८ मी व २५ मी या लांबीमध्ये वापरण्यात येणार आहे. हे रेल्वे रूळ अत्याधुनिक फ्लॅश बट व अल्युमिना थर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहे.  त्या जोडलेल्या रेल्वे रुळांचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक मशीनद्वारे टेस्टिंग केले जाणार आहे. या रुळाची झीज कमी होवून रुळांचे आयुष्य वाढेल, रूळ बदलण्याची
लवकर लवकर आवश्यकता पडणार नाही.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ९००० M T रुळांची आवश्यकता आहे. रिच १ व रिच २ प्रायरीटी सेक्शनसाठी एकूण ३००० M T रूळ लागणार आहेत. नागपूरहून ६०० M T रूळ पुण्याला येणार आहेत. हे रूळ इस्ट मेटल A G या स्वित्झर्लंडच्या कंपनीने त्यांच्या सायबेरियातील कारखान्यात बनविले आहेत. साधारणतः एका किलोमीटर रेल्वे मार्गासाठी १२० टन रेल्वे रुळांची आवश्यकता असते.

पुणे मेट्रोचा उन्नत व भूमिगत मार्गाचा ट्रॅक हा बॅलास्ट लेस या प्रकारातला असणार आहे. रेल्वे प्रणालीत रेल्वे रूळ दगडाच्या खडीवर ( बॅलास्ट) टाकण्यात येतात. जेणेकरून रेल्वे रुळावरून कोच जाताना रेल्वे रूळ खाली दाबले जाऊन कुशन सारखा परिणाम साधता येतो. बॅलास्ट सहित (Ballasted) रुळांचे अनेक तोटे असल्यामुळे पुणे मेट्रोमध्ये बॅलास्ट विरहीत (Ballastless) रूळ टाकण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायक (कम्फर्ट) मध्ये वाढ होणार आहे. अशाप्रकारचा बॅलास्ट विरहीत ट्रॅकचे इतरही अनेक फायदे आहेत.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, रेल्वे रुळांचे आगमन पुणे मेट्रोच्या पूर्णत्वाकडे जाणारा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. उन्नत मेट्रो प्रकल्प सर्वप्रथम खांबाचा पाया उभारण्यात येतो. त्यानंतर पिअर कॅप व व्हायाडक्ट यांची उभारणी करण्यात येते. अशाप्रकारे विविध टप्प्यामंधून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे चालला आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button