breaking-newsराष्ट्रिय

कन्हैया कुमार बिहारमधून लढणार लोकसभा

पाटणा- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचा (जेएनयू) माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे. कन्हैय्या कुमार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. कन्हैय्या कुमारने लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सर्व डाव्या संघटनांमध्ये एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कन्हैय्या कुमार बिहारच्या बेगूसराय येथून सीपीआयच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे.

कॉंग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीकडून कन्हैय्या कुमार हा बेगूसराय येथून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीवर लालू प्रसाद यादव यांनाही कळवण्यात आले असून त्यांनाही यावर कोणताच आक्षेप नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कन्हैय्या कुमारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, एप्रिल महिन्यात कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने राष्ट्रीय परिषदेत कन्हैय्या कुमारला जागा दिली होती. 125 जणांच्या राष्ट्रीय परिषदेत सदस्य म्हणून कन्हैया कुमारची निवड झाल्यानंतरच तो राजकारणात येणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात होती. याशिवाय काही महिन्यांपूर्वी जर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डाव्या संघटनांनी महाआघाडी स्थापन केली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे कन्हैया म्हणाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button