breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाक दहशतवाद्यांचा काळ बनणार SIG-716, सीमेवर जवानांच्या हाती आले घातक शस्त्र

महाईन्यूज

चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना अखेर १५ वर्षानंतर नवीन असॉल्ट रायफल्स मिळालेल्या आहेत. अमेरिकन बनावटीच्या या नवीन रायफल्स दीर्घ पल्ल्याच्या असून सीमा रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठीच खास या असॉल्ट रायफल्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन कंपनी सिग साउरसोबत भारत सरकारने ६३८ कोटी रुपयांचा रायफल्स खरेदीचा करार केला आहे.

त्यातील ७२,४०० पैकी पहिल्या १० हजार रायफल्स लष्कराला मिळाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ५०० मीटरपर्यंत रेंज असलेल्या या सर्व असॉल्ट रायफल्स २०२० पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. करारानुसार, भारताला एकूण ७२,४०० SiG-716 असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत. त्यापैकी सैन्याला ६६,४०० इंडियन एअर फोर्सला चार हजार तर, नौदलाला दोन हजार रायफल्स मिळणार आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या रायफल्स अत्याधुनिक असून त्यांची देखभाल करणेही सोपे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button