ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत” अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल ३० क्विंटल साखरेचे स्वखर्चाने वाटप

जामनेर: जामनेर येथे अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाघारी बेटावद जिल्हा परिषद गटात अरविंद चितोडिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  सेल तर्फे भव्य साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेते आहेत. आपला आक्रमक स्वभाव आणि कामाच्या शैलीमुळे ते सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. जळगावातही अजित पवारांवर जीव ओवळणारा असाच एक कार्यकर्ता आहे. अरविंद बंगालसिंह चितोडिया असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या अरविंद चितोडिया चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या एका उपक्रमामुळे. अजित पवारांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवारांना जनतेचे आशीर्वाद मिळून त्यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अरविंद हे चक्क 30 क्विंटल साखर लोकांना घरोघरी जाऊन वाटत आहे.

 

अरविंद चितोडिया याने 30 क्विंटल साखर वाटण्याच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे. “उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. त्यांची कार्यशैली मला भावते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे अशा नेत्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून जनतेचे आशीर्वाद मिळायला हवेत. हेच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही लोकांना घरोघरी जाऊन साखर वाटत आहोत. साखरेने लोकांचे तोंड गोड व्हावे, अजित पवारांबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण व्हावी, म्हणून आम्ही साखर वाटप करत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून अजित पवारांना जनतेकडून चांगले आशीर्वाद मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे,” असे अरविंद यांने सांगितले.

 

यावेळी जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस अविनाश आदीक साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तिथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हा बँक चे अध्यक्ष रोहिणी ताई खडसे संजय काका पवार संजय दादा गरूड महीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष वंदना ताई चोधरी महानगर महिला अध्यक्ष मंगलाताई पाटील उमेश काका नेमाडे योगेश काका देसले युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील वाल्मिक पाटील डी के दादा ज्ञानेश्वर बोरसे प्रमोद नाना पाटील भगवान काका पाटील प्रदीप भाऊ लोढा अशोक भाऊ पाटील राजेश नाईक जामनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील किशोर भाऊ पाटील प्रल्हाद भाऊ बोरसे युवक तालुका पप्पू पाटील अध्यक्ष शैलेश पाटील शहर युवक अध्यक्ष विनोद माळी मोहन चौधरी दीपक महाराज ही सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button