breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दु:खद! पद्म विभूषण सन्मानित विदुषी कपिला वात्सायन यांचे निधन

मुंबई: विदुषी कपिला वात्सायन यांचे निधन झाले आहे. त्या 91 वर्षांच्या होत्या. दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेताल. त्या दिल्ली येथील गुलमोहर पार्क परिसरात एकट्याच राहात. कपीला वात्सायन यांनी विविध क्षेत्रात काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना इतिहासकार, नृत्य विद्वान अशा एकापेक्षा एक अनेक उपाधीने जनमानसात ओळखले जात असे. त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेले होते. त्या राज्यसभेच्या मानद खासदारही त्या राहिलेल्या होत्या. कपिला वात्सायन यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात दु:खाची लाट निर्माण झालेली आहे. कपिला वात्सायन या प्रतितयश कवी सच्चिदानंद हीरानंद वात्सायन यांच्या पत्नी होत.

साधारण 1960 मध्ये त्यांनी पतीपासून काडीमोड घेतला. तेव्हापासून त्या एकट्याच राहात होत्या. इंडिया इटरनॅशनल सेंटरच्या त्या आजीवन सभासद होत्या. त्यांना कला आणि नृत्य क्षेत्रातील अभ्यासक, जाणकार आणि निष्णात माणले जात असे. डॉ. कपिला या केवळ नृत्य विद्वानच नव्हत्या तर त्या भरतनाट्यम, ओडिसी यासोबतच कथ्थक आणि मणिपूर नृत्य आदींमध्येही पारंगत होत्या. कपिला यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 25 डिसेंबर 1928 मध्ये झाला. डॉ. कपिला वात्सायन यांनी 1946 मध्ये दिल्ली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या हिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. 1948 मध्ये त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शिक्षण दिल्ली बनारस हिंदू विद्यापीठ आणि अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातूनही झाले. त्याना भारतीय संस्कृती आणि कलेची चांगली जाण होती. कपिला वात्सायन यांच्या आई सत्यवती मलिक या थोर लेखिका होत्या. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button