breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद

  • राज्य सरकारकडून राणे यांना निमंत्रण नाही; राणे यांचे प्रत्युत्तर

मुंबई |

कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणाऱ्या आणि विकासाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली. दुसरीकडे, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही उद्घाटनाची घोषणा करताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीची आवश्यकता नाही, असा दावा के ला. त्यावर कु रघोडी म्हणून राणे यांच्यासह इतर नावांचा निमंत्रणाकरिता विचार झालेला नाही, असे देसाई यांनी सांगितल्याने शिवसेना विरुद्ध राणेवादाचा पुढील अंक विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात बघायला मिळण्याची चिन्हे आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा राज्य सरकार आणि राणे यांच्याकडून करण्यात आली. शिवसेना आणि राणे यांनी परस्परांवर या निमित्ताने कु रघोडी करण्याचा प्रयत्न के ला. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख राज्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी जाहीर के ली. तत्पूर्वी राणे यांनीही अशीच घोषणा के ली होती.

  • एमआयडीसीचा प्रकल्प

उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून हे विमानतळाचे  काम केले आहे. एकू ण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली. सुमारे ५२० कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.

आयआरबी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी व संचालन (ऑपरेशन्स) करारावर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भिंत यासारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

विमान पत्तन प्राधिकरण, नागरी विमान महासंचालनालयांतर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत.  विमानतळामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळेल असेही देसाई यांनी नमूद केले.

  • समन्वयाने प्रश्न सोडवावा -फडणवीस

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून वाद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा, असा सल्ला दिला. विमानतळाच्या उभारणीत नारायण राणे यांचे योगदान आहे. राज्य सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा करू नये, अशी मागणी त्यांनी के ली.

  • ‘मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे’

चिपी विमानतळ शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे नाही, तर भाजपच्या पाठपुराव्यामुळे होत आहे. पण विमान सेवा सुरू करण्याचा समारंभ होणार असताना मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि त्यांनी कार्यक्रमास आले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. यासंदर्भात  शेलार म्हणाले, चिपी विमानतळाची मुहूर्तमेढ भाजपने रोवली व पाठपुरावा केला. शिवसेनेचा काहीही संबंध नाही. दरम्यान, मंदिरे आणि आरोग्य मंदिरे या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता दाखवीत असल्याची टीका करून शेलार म्हणाले, राज्यात सुरू असलेले डिस्को बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा सवाल केला.

चिपी विमानतळाचा प्रकल्प उद्योग विभागाच्या एमआयडीसीने राबवला आहे. त्यामुळे आम्ही यजमान आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्योतिरादित्य शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी उद्योगमंत्री म्हणून मी उपस्थित असेन. इतर कोणाला बोलवायचे याबाबत अद्याप विचार झालेला नाही.

 – सुभाष देसाइ, उद्योगमंत्र्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button