breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: तूर्तास मुंबईहून कोल्हापूरकडे प्रवासी पाठवू नका; सतेज पाटील यांचं पोलीस महासंचालकांना पत्र
मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला सोसेना झाला आहे. कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारं नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.