breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा खासदार रामदास तडस सूनेला मारहाण करत असल्याच्या आरोपानंतर मोठा ट्विस्ट

वर्धा |

वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांचं नाव मंगळवारी चर्चेत आलं होतं. यामागचं कारण म्हणजे त्यांच्या सूनेचा प्रसिद्ध झालेला एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये त्यांच्या सूनेने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली होती. रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना रामदास तडस आणि कुटुंबाकडून मारहाण, अत्याचार होत असल्याचा आरोप केला होता. यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं पहायला मिळत असताना संध्याकाळी या प्रकरणात मोठा ट्विस्ट पहायला मिळाला.

सकाळी आरोप करणाऱ्या पूजाने संध्याकाळी खासदार तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांच्याशी लग्न केलं आणि या सगळ्या वादावर पडदा पडला. दोघांचंही घरातच साध्या कार्यक्रमात वैदिक पद्धतीने लग्न पार पडलं. पंकज तडस आणि पूजाच्या या लग्नासोसबत वादावर पडदा पडल्याचं सांगण्यात आलं. दोघांचं याआधी रजिस्टर पद्धतीने लग्न झालं होतं. पूजाच्या व्हिडीओनंतर निर्माण झालेल्या वादानंतर घरातच पूजा आणि तडसचं लग्न लागलं. त्यामुळे सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न असा ट्विस्ट या प्रकरणात पहायला मिळाला.

  • नेमकं काय झालं होतं…

रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. १२ सेकंदाच्या या व्हिडीओत दिसणारी महिला सांगत होती की, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे येथे, मॅडम प्लीज मला येथून घेऊन चला. मी विनंती करते”.

  • रामदास तडस यांनी काय दिली होती प्रतिक्रिया

“मागील वर्षी २० जून २०२० ला पंकज या माझ्या मुलाला संपत्तीतून बेदखल केलं होतं. त्यानंतर तो वर्ध्याला घर घेऊन राहायला लागला. त्याने पूजा नावाच्या मुलीसोबत ऑक्टोबरमध्ये लग्न केलं. त्यावेळेस आमच्या घरातल्या कुणालाच काहीही माहिती नव्हतं. लग्नाच्या वेळी मुलीचे जावई आणि बहीण हेच होते आणि त्यांनी ते लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघे जण फ्लॅटवर राहायला लागले. पंकज आणि पूजा एक दिवस माझ्याकडे आले. बाबा म्हणे आम्ही लग्न केलं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही लग्न केलं चांगलं झालं, तुम्ही दोघं सुखानं राहा. तुम्हाला घरी यायची इच्छा असेल, तर या…तुमच्यासाठी आमचं घर खुलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा यांनी आरोप केला की त्या सुरक्षित नाहीत, कुटुंबापासून धोका आहे. पण ते आमच्यासोबत राहातच नाही. राजकारणासाठी राजकारण करायचं, भाजपाच्या लोकांवर बेछुट आरोप करायचे. मी खासदार आहे. माझी पत्नी नगराध्यक्ष राहिली आहे. माझी मुलगी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमचं राजकारण कसं संपवायचं यादृष्टीनं विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत,” असा आरोप खासदार रामदास तडस यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button