breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत- मुख्यमंत्री

मुंबई – देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत, असं म्हटलं. बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. डॉ. मधुरा पाटील यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

वाचा :-जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाला सुरुवात, मोदींकडून मोहिमेला प्रारंभ

लसीकरणाला सुरुवात झाली असली तरीही आपण बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. सोशल डिन्स्टन्सिंग आणि मास्क यापासून आपली सुटका नाही. त्यामुळे लस आली म्हणजे सगळं संपलं असं नाही. आपल्याला काळजी घ्यावीच लागणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, कोरोना काळात कोविड सेंटरचा खूप मोठा आधार मिळाला. संकटाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ मिळाली. असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचं पहिलं लसीकरण डॉ. मधुरा पाटील यांना करण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button