breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना भाजपकडून नवीन ऑफर; पत्र लिहून सांगितलं, ‘दिल्लीला वाचवा’

नवी दिल्ली: भाजप दिल्लीचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना पत्र लिहिलेले आहे. आदर्श गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की आम आदमी पार्टी भ्रष्टाचारात सामील आहे, तुम्ही दिल्लीत येऊन हे लोकांना सांगा. आदर्श गुप्ता यांनी या पत्रात असेही लिहिले आहे की, तुमच्या नेतृत्वात AAPने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविलेला होता, आज तोच पक्ष स्वतः त्यात सामील आहे. आदर्श गुप्ता यांचे हे पत्र अशा वेळी आले आहे जेव्हा काही जणांनी बनावट कंपनी तयार करून AAPला दोन कोटींची देणगी दिल्याचा आरोप होता, आता त्यांना अटक केलेली आहे.

आदर्श गुप्ता यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, “आम्हाला आठवते की 5 एप्रिल 2011 रोजी तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जनलोकपाल विधेयकाची मागणी करुन तत्कालीन सरकारविरूद्ध आमरण उपोषण केलेले होते. तुमच्या आंदोलनाला दिल्लीसह देशभरातील कोट्यावधी लोकांनी पाठिंबा दिलेला होता. त्यानंतर तुमच्याच नावाने काही लोकांनी स्वच्छ राजकीय व्यवस्थेची बाजू मांडत, निवडणुका लढवल्या आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाची राजकीय पक्ष म्हणून स्थापन केलेली होती.

अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रात आदेश यांनी असेही असेही म्हटले आहे की, सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्राध्यापक आनंद कुमार, कुमार विश्वास यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले आहे. सोमनाथ भारती असो की संदीप कुमार, अमानतुल्ला खान किंवा जितेंद्र तोमर या नावांची यादी लांबलचक आहे. खोटी आश्वासने, खोटे हेतू आणि जातीय राजकारणाच्या आधारे पुन्हा सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील लोकांना AAPने केलेल्या जातीय दंगलींचा सामना करावा लागला होता. अण्णा हजारे यांना पुन्हा दिल्लीत परत यावे आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा आणि या आंदोलनात भाजपला पाठिंबा द्यावा अशी विनंती आदित्य गुप्ता यांनी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button