breaking-newsमहाराष्ट्र
#CoronaVirus:अलिबागमध्ये 11 कोरोना पॉझिटिव्हअलिबागमध्ये
रायगड : अलिबाग तालुक्यात आज एकाच दिवशी 11 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये अलिबाग शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ही माहिती दिली.
अलिबाग शहरातील कोळीवाडा येथील 51 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. या व्यक्तीची स्वॅब टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. याव्यतिरिक्त नारंगी येथे 4, सुडकोली येथे 2, तळवली येथे 3, परहूरपाडा येथे 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. या सर्वांचा कोविड-19 चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित 26 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.