breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Deputy Mayor Election| आमदार महेश लांडगे माझ्यासाठी प्रामाणिक, ते म्हणतील ती पूर्व दिशा : नगरसेवक वसंत बोराटे

उपमहापौरपदासाठी चर्चेत असलेल्या बोराटे यांची पहिली प्रतिक्रीया

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड उपमहापौरपदासाठी मला संधी देण्याबाबत शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या नावाची शिफारस केली. पण, संधी मिळाली नाही. आमदार लांडगे माझ्यासाठी प्रामाणिक आहेत. ते म्हणतील ती पूर्व दिशा असेल, माझी नाराजी नाही, अशी प्रतिक्रीया नगरसेवक वसंत वोराटे यांनी ‘महाईन्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

नगरसेवक बाराटे हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून बोराटे यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, अर्ज भरण्याच्या एक दिवस आगोदर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नगरसेवक केशव घोळवे यांच्या नावासाठी आग्रह धरला. परिणामी, महेश लांडगे यांना माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आमदार लांडगे गटामध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे.

नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले की, उपमहापौरपदासाठी आमदार लांडगे यांनी मला संधी देण्याबाबत सांगीतले होते. पद मिळाले नाही म्हणून कसलीही नाराजी नाही. तसा प्रश्न उपस्थितच होत नाही. आमदार लांडगे जोकाही निर्णय घेतात तो आम्हाला मान्य आहे. सहा-सात महिन्यांमध्ये पुन्हा उपमहापौरदाची निवडणूक झाली, तर आम्हाला निश्चित संधी मिळले, असा विश्वासही बोराटे यांनी व्यक्त केला आहे.

वसंत बोराटे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी…

महापालिका प्रभाग क्रमांक २ मधील चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बो-हाडेवाडी, वुड्स विला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुडळवाडीचा काही भाग या परिसरातून वसंत बोराटे प्रतिनिधीत्व करतात. मोशी-चिखली- बोऱ्हाडेवाडी या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. विशेष म्हणजे, तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत बोराटे यांच्या उपमहापौरपदाच्या संधीचा फायदा होईल, असा कयास आमदार लांडगे यांनी बांधला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button