breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

बापरे! भिकारी महिलेच्या बँक खात्यात सापडले तब्बल 1.4 कोटी रुपये

नवी दिल्ली: भिकारी हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला मनात असहाय्य माणसाची प्रतिमा उमटते आहे. परंतु, भिकाऱ्याकडे 5 इमारती आणि बँकेत 1.4 कोटी रुपये जमा असल्यासचं ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, इजिप्त मध्ये असं घडलं आहे. तिथल्या पोलिसांनी 57 वर्षांच्या महिला भिकाऱ्याला अटक केलेली आहे. या महिलेच्या नावावर पाच इमारती आणि बँक खात्यात 1 कोटी 42 लाख रुपये जमा असल्याचं उघडकीस आलेलं आहे. या करोडपती भिकारी महिलेचे नाव नफिसा असं आहे. नफिसा भीक मागण्यासाठी आपल्या शारीरिक अंपगत्वाचे कारण देत व्हीलचेयरचा वापर करत होती.

परंतु, अनेकदा भीक मागताना ती चालताना दिसली, असा दावादेखील इजिप्तमधील काही नागरिकांनी केला आहे. इजिप्तमधील अनेक राज्यात या महिलेने अंपगत्वाचे कारण सांगत भीक मागितलेली आहे. दरम्यान, गल्फ न्यूज डॉट कॉमच्या (gulfnews.com) वृत्तानुसार, या भिकारी महिलेचे इजिप्तच्या बँकेत सुमारे दीड कोटी रुपये आहेत. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्र Al Masry Al Youm च्या वृत्तानुसार, महिला भिकारी एका व्हीलचेयरवर बसून भीक मागत असे. ती लोकांना आपल्याला एक पाय नसल्याचे दाखवत होती. ती इजिप्तच्या बर्‍याच राज्यांत भीक मागण्यासाठी फिरत असे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button