breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले..

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. त्यानिमित्त शुभेच्छा द्यायला पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो इर्शालवाडी गावाच्या पूर्नउभारणी मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा.

हेही वाचा – मणिपूरमधील ‘त्या’ घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले..

दरड जिथे कोसळली तो भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. ही घटना समजल्यानंतर, साडेसात पर्यंत नियंत्रण कक्षात बसून होतो. एकंदरीतच पाच लोक अद्यापपर्यंत दगावली आहे. जखमींना पनवेल, एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरने छोटं मशिन पाठवायचं असेल तर ते एक टन पर्यंतच वजन उचलू शकत आहे. तसंच, हवामान खराब असल्याने टेक ऑफ करता येत नाही, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button