breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्सीखेच, नुसते दावे-प्रतिदावे

मुंबई : लोकसभेचं घोडामैदान जवळ येत असताना इच्छूकांची गर्दीत इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेत महाविकासआघाडीहून महायुतीत जास्त रस्सीखेच सुरु आहे.आता दावे-प्रतिदावे रंगताना दिसत आहेत.  रत्नागिरी-सिंदुदुर्गची जागा भाजपच लढणार हे नारायण राणेंनी ट्विट केल्यानंतर जागावाटपाचे अधिकार शिंदेंना असल्याचं उत्तर उदय सामंतांनी दिलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंमध्ये लढत झाली. या निवडणुकीत विनायक राऊत यांना ४,५८,०२२ तर निलेश राणेंना २,७९,७०० मतं पडली. राऊतांनी १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी राणेंचा पराभव केला होता

अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठीही महायुतीत मोठी चुरस दिसतेय. या मतदारसंघात आपण ५ वर्षांपासून तयारी करतोय, यंदा आपण ५ लाख मतांनी जिंकून येवू, असा दावा भाजपच्या सुजय विखेंनी वर्तवलाय. तर भाजपच्या राम शिंदेंनीही नगर लोकसभेतून लढण्याची इच्छा बोलून दाखवलीय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निलेश लंकेंनीही आधीपासून तयारी सुरु केलीय. नगरची जागा भाजपला गेली तर निलेश लंके पुन्हा शरद पवारांकडे परतणार का? याच्याही चर्चा आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंकेंच्या कार्यक्रम आणि बॅनरवर शरद पवारांचा फोटो लागतोय.

संभाजीनगर लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे इच्छुक असताना आता भाजपच्या भागवत कराडांनीही इच्छा बोलून दाखवलीय. आधीच्या समीकरणांनुसार संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचं नाव चर्चेत राहतंय. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून अद्याप कोणतंही नाव चर्चेत नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून यावेळी संदीपान भुमरे इच्छुक आहेत. तर भाजपचे मंत्री भागवत कराड यांनीही भाजपकडून संभाजीनगरमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा वर्तवलीय.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजपच्या गावित विरुद्ध काँग्रेसच्या के. सी. पाडवींमध्ये लढत झाली. गावितांना ६,३९,१३६, पाडवींना ५,४३,५०७ मतं मिळाली. गावितांचा ९५,६२९ मतांनी विजय झाला आणि पाडवी पराभूत झाले.

हेही वाचा – दहावीची परीक्षा आजपासून; १६ लाख विद्यार्थ्यी सज्ज

गेल्यावेळी नगर लोकसभेसाठी भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांमध्ये सामना झाला होता. विखेंना ७,०४,६६० तर जगतापांना ४,२३,१८६ मतं पडली होती. त्यावेळी विखेंचा २,८१,४७४ विजय झाला होता.

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना ३,८९,०४२, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना ३,८४,५५०, अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना २,८३,७९८, तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना ९१,७८९ मतं पडली. यात ४ हजार ४९२ मतांनी जलील यांचा विजय झाला. संभाजीनगरची लोकसभेची जागा भाजपने मागितली आहे. संभाजीनगरच्या जागेसाठी आमची तयारी सुरु आहे पण महायुती जो निर्णय घेइल तो अम्हाला मान्य असेल. संभाजीनगरचा खासदार या वेळचा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा असेल यावर आमचं लक्ष असणार, संभाजीनगर च्या जागेसाठी मी उत्सुक आहे. परंतु पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करणार, असं भागवत कराड म्हणाले आहेत.

नंदुरबार लोकसभेची जागा युतीत भाजप लढत आलीय. तर आघाडीत ही जागा काँग्रेस लढत होती. यंदा भाजपकडून विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून अद्याप कुणाच्याही नावाची चर्चा नाही. अजित पवार गटानं इथं भाजपच्या हिना गावितांना पाठिंबा दिलाय. मात्र शिंदेंचे शहरप्रमुख चंद्रकांत सूर्यवंशींनी हिना गावितांना उमेदवारी देण्यास विरोध केलाय.

तिकडे हिंगोलीची जागा युतीत शिवसेनेकडे आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदेंकडे आहेत. ते पुन्हा इच्छुक असताना भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळेंनी हिंगोलीवर दावा सांगत त्यासाठी तयारीही केल्याचं बोललं जातंय. हिंगोली लोकसभेवर भाजपचे वर्चस्व असल्याचा उल्‍लेख मुटकुळे यांनी केला. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ महायुतीमधून भाजपलाच सोडवावा, अशी मागणी केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडावा या मागणीसाठी येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्यावेळी शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंमध्ये हिंगोलीची लढत झाली होती. हेमंत पाटलांना ५,८६,३१२ तर वानखेडेंना ३,०८,४५६ मतं पडली होती. पाटील २ लाख ७७ हजार मतांनी जिंकले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button