ताज्या घडामोडीमुंबई

कंपनीच्या गोपनीय तपशिलाच्या बदल्यात बिटकॉइनमध्ये खंडणीची मागणी

मुंबई | कापड व्यवसायात कार्यरत असलेल्या वरळीतील कंपनीच्या सव्‍‌र्हरमध्ये शिरकाव करून गोपनीय माहितीवर ताबा मिळवून त्या बदल्यात बिटकॉइनमध्ये खंडणी मागण्यात आली आहे. हॅकर्सनी कंपनीच्या लेखापालाला ई-मेल पाठवून खंडणीची मागणी केली आहे. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वरळी परिसरातील पांडुरंग बुधकर मार्गावरील सुमेर केंद्र येथील केिनगटन इंडस्ट्रीज प्रा. लि.मध्ये काम करणारे लेखापाल किशोर वामनपूर (४२) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करोनाकाळात कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीचा डेटा सव्‍‌र्हरवर ठेवण्यात आला असून त्यामार्फत काम केले जाते. कंपनीतील कर्मचारी दारा मिस्त्री काम करत असताना डेटा इन्क्रिप्ट करण्यात आला असून त्यासाठी २४ तासांत पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. हा संदेश त्यांनी पाहिल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली असता त्यांचे सव्‍‌र्हर हॅक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत तक्रारदार वामनपूर यांच्या ई-मेलवर आरोपींनी संदेश पाठवला होता.

१९ जानेवारी ते २१जानेवारीच्या दरम्यान तक्रारदार यांच्या कंपनीमधील सव्हर्रमध्ये शिरकाव करून हॅकर्सने त्यातील सर्व गोपनीय माहिती इन्क्रिप्ट केली आहे. त्यामुळे पासवर्डशिवाय ती उघडणे शक्य नाही. याबाबत तक्रारदार यांच्या ई मेल आयडीवर एक ई-मेल आला असून त्यात कंपनीचा गोपनीय डेटा इन्क्रिप्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. हा डेटा सुस्थितीत पाहिजे असेल, तर १३५० अमेरिकन डॉलर (सुमारे एक लाख रुपये) बिटकॉइन स्वरूपात देण्यास सांगितले आहे. त्यासाठी ई-मेलवर संपर्क साधण्यास आरोपींनी सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button