ताज्या घडामोडीमुंबई

८९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे ; आठव्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर

मुंबई | करोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा किती प्रसार झाला याची पडताळणी करण्यासाठी केलेल्या आठव्या चाचणीचे निष्कर्ष पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. या आठव्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने मुंबई महापालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. मुंबईतील २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के अर्थात २४८ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. ८ टक्के अर्थात २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ या उपप्रकाराने, तर उर्वरित सुमारे सुमारे ३ टक्के अर्थात ११ नमुने हे इतर उपप्रकारांचे असल्याचे आढळून आले आहे.

‘करोना १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. याअंतर्गत आठव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button