breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

रवींद्र धंगेकरांच्या प्रचारपत्रकावर घड्याळ, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुणे | महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारपत्रकात घड्याळ चिन्हाचे छायाचित्र वापरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही तक्रार दिली आहे. त्यामुळे धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रचार पत्रकांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जाणीवपुर्वक मतदारांची दिशाभूल करून मते मिळवण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह छापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निकालास अधीन राहून केवळ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आचारसंहितेचा भंग झाला असून संबंधितांची चौकशी करून कायदेशीन कारवाई करावी, असं पत्रात नमुद करण्यात आलं आहे.

हेही वाचा     –      डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल, दोन आरोपींना जन्मठेप, तिघे निर्दोष 

हिंदमाता प्रतिष्ठान तर्फे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील सातव हॉल सहकार नगर येथे ०७ मे रोजी संध्याकाळी भारतातील ११ संत महंत व शक्तिपीठांच्या पादुकांचा दर्शनाचा अभुतपुर्व सोहळा असे धर्माच्या संतांच्या नावावर फ्लेक्स छापून तिथे धंगेकरांचे विनापरवाना प्लेक्स व साडी वाटप होत असल्याची तक्रार भाजपच्या नेत्या अॅड माधवी निगडे यांनी निवडणुक आयोगाकडे दिली आहे.

माधवी निगडे यांनी तक्रार दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहिले असता धंगेकरांचा विनापरवाना प्लेक्स व साडी वाटप करतानाचे बॉक्स सापडल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर धंगेकरांचे नाव व फोटो छापलेले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने कलम १७१ व लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२७ ए अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजक सुमेध धनवट यांच्याविरोधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button