breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी ६ जवांनाची टेस्ट पॉझिटिव्ह

नवी मुंबई | केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथे नियुक्त असलेले १३९ अधिकारी आणि सेवेसाठी असलेल्या १२ जणांपैकी ५ जवानांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर आता आणखी ६ जवानांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून गुरुवारी रात्री उशिरा १४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळंबोली येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश जारी केले होते.

त्यानंतर तात्काळ या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली असता यापैकी ६ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे करोना संसर्ग वाढण्याचा धोका टळला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button