breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर भाजपची धुरा ‘रामभक्त हनुमान’ कडे की, जुन्या-जाणत्यांना संधी?

भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून निर्णयाची प्रतीक्षा

पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच या निर्णयाची औपचारिक घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यापुढे ही जबाबदारी पार पाडण्यास ते अनुत्सुक असल्याने नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा नवीन शहराध्यक्षांच्या नावाबाबत ते शहरातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करीत आहेत.

शहराध्यक्षपदासाठी चंद्रकांतदादांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे अॅड. सचिन पटवर्धन आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे यांची नावे आघाडीवर होती, मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराध्यक्षपदी ‘आमदार’च असावेत, अशी भूमिका घेतल्याने ती जबाबदारी महेश लांडगे यांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

आमदार लांडगे हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. भाजपमधील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून पक्ष संघटना मजबूत करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा पक्षाच्या नेत्यांना विश्वास आहे.

राज्यातील सत्ता गेल्याने भाजप शहराध्यक्ष निवडीला विलंब लागला. शहराध्यक्षांची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवड होईल, असे सांगण्यात आले होते. राज्यात भाजपची सत्ता असताना शहराध्यक्षपदासाठी मोठी चुरस होती. परंतु, राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चुरस राहिली नाही. निवड देखील लांबणीवर पडली.  राज्यात सत्ता नसल्याने राज्यातून रसद मिळणार नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button