breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दुध दरवाढीवर आवाज उठवा ; अन्यथा आमदाराच्या घराला घेराव – युवक काॅंग्रेसचा इशारा

सांगोला : शेतक-यांच्या प्रश्नावर भाजप सरकार संवेदनशिल नसून त्यांनी शेतक-यांची कुचेष्टा लावली आहे. शेती मालाला हमी भाव, दुध दरवाढ, शेतकरी कर्जमाफी यासह आदीं प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.  शेतकरी प्रश्नावर सांगोल्यातील शेकापचे विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी 20 मे पर्यंत विधानसभेत आवाज उठवावा, अन्यथा 21 मे रोजी आमदारांच्या घराला घेराव घालून एक दिवसीय उपोषण करण्यात येईल, असा इशारा युवक नेते सुनिल पवार यांनी आंदोलनप्रसंगी दिला.
शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत सांगोला तालुका युवक कॅाग्रेस, संभाजी बिग्रेड यांच्या वतीने आज (मंगळवारी) पंढरपुर-मिरज रस्त्यावरील कडलास नाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नानासो इवरे,  संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार,  मंगळवेढा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन नागणे, पंढरपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अरुण आसबे, बापूसाहेब ठोकळे, नंदकुमार शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ, तालुका उपाध्यक्ष डॉ.विजय बाबर, शहराध्यक्ष प्रताप इंगोले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता टापरे, शहराध्यक्ष अजयसिंह इंगवले, कृष्णा भजनावळे यांच्यासह युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नायब तहसिलदार बाळासाहेब बागडे व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना निवेदन दिले. तसेच  दूध दरवाढीच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलनाला आरपीआय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन, भारिप,  मनसे यांनी पाठिंबा दिला. तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button