breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: भारतात लवकरच कोरोना रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लास्मा थेरपीने उपचार

भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लास्मा या नव्या पद्धतीने उपचार करण्याची तयारी सुरु आहे. लवकरच या थेरपीच्या क्लिनिकला चाचण्या सुरु होतील. कॉनव्हॅलसंट प्लास्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे.

भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कॉनव्हॅलसंट प्लास्माच्या चाचणीसाठी कुठली मार्गदर्शकतत्वे असावीत त्यावर काम करत आहे. मार्गदर्शक तत्वे निश्चित झाल्यानंतर त्यासंबंधीचा आराखडा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल. पुढच्या दोन दिवसात हा आराखडा अंतिम होईल. ही नवीन उपचार पद्धती असल्याने त्याच्या चाचण्या आवश्यक आहेत. त्यासाठी डीसीजीआयची परवानगी आवश्यक आहे. करोना व्हायरसवर उपचारासाठी डॉक्टरांकडे अत्यंत कमी पर्याय उपलब्ध असताना ही नवी उपचार पद्धती पूर्णपणे भिन्न आहे.

“दुसऱ्या देशातील व्हेंटिलेटरवर असलेल्या काही रुग्णांवर या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला आहे. प्रत्येकावर या पद्धतीने उपचार होणार नाहीत. पण कुठल्या रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लास्माने उपचार करायचे त्या रुग्णांची आम्ही निवड करु. Covid-19 संदर्भात डीसीजीआयने वेगाने परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच चाचण्या सुरु होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे” असे डॉक्टर मनोज मुरहीकर यांनी सांगितले. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे संचालक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button