breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानांची आरास

पंढरपूर | प्रतिनिधी 
महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात विविध फुलांची व बेलाच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. ही सजावट पंढरपूर येथील भाविक रमेश पांडुरंग कोळी यांनी केली आहे.

झेंडू, गुलाब, मोगरा, गुलछडी, अष्टर अशी विविध फुले, बेलाचे पान अशा ७०० किलो पाना-फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभा मंडप याठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. देवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केल्याचे दिसून आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button