breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भाऊ, दादा पैसे खाई.. शहराला आमच्या पाणी नाही.., राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल आंदोलन

पिंपरी | प्रतिनिधी

भाऊ, दादा पैसे खाई… शहराला आमच्या पाणी नाही.. सत्ताधारी भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय.. शहरावसीयांना दररोज पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (दि.१५) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, शाम लांडे, पंकज भालेकर, मयूर कलाटे, संजय वाबळे, राजू बनसोडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, सारिका पवार, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका अपर्णा डोके, सुलक्षणा शिलवंत-धर, माई काटे, अनुराधा गोफणे, संगिता ताम्हाणे, विमल काळे, माजी महापौर शकुंतला धराडे, माजी नगरसेविका शमीम पठाण, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक अतुल शितोळे, सनी ओव्हाळ, सरचिटणीस इखलास सय्यद, अमित लांडगे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर २०१९ पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे. पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली.एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला. त्यानंतर प्रशासनाने नोव्हेंबरअखेरपासून टप्या-टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. परंतु, ती डेडलाईनही प्रशासन पाळू शकले नाही. याला भाजप जबाबदार आहे. सत्ताधारी भाजप शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button