breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

आता WhatsApp वरूनही पाठवता येणार पैसे…

WhatsApp Pay ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून परवाना मिळाल्याने भारतात लवकरच WhatsApp वरून पैशांची देवाण-घेवाण करता येणारआहे.  कंपनी सर्व ग्राहकांना ही सेवा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक आता WhatsApp वरूनच एकमेकांना पैसे पाठवू शकणार आहेत.

WhatsApp ने २०१८ मध्ये या पेमेंट सेवेला बिटा टेस्टिंगच्या रुपात जवळपास १० लाख युजर्ससाठी जारी केले होते. परंतु, याला कायदेशीर मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ही सेवा सर्व युजर्सपर्यंत पोहोचली नव्हती. परंतु, आता Business Standard च्या एका रिपोर्टनुसार, भारतात WhatsApp Pay ला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात ही सेवा १० लाख युजर्सपर्यंत पोहोचू शकते. WhatsApp Pay ला गुरुवारी NPCI कडून मंजुरी मिळाली.

ही सेवा सुरू झाल्यानंतर ती भारतातील सर्वात मोठी मोबाइल पेमेंट सेवा ठरू शकते. भारतात कोट्यवधी लोक WhatsApp वापरत असल्याने ही सेवा नंबर वन होण्यासाठी WhatsAppला फार काही करण्याची गरज नाही. भारतात सध्या ४० कोटींहून अधिक लोक WhatsAppचा वापर करतात…कंपनीने WhatsApp Pay सेवेला फेब्रुवारी २०१८ मध्ये टेस्टिंग मोडवर लाँच केले होते. युजर्सकडे एपच्या आत एक पेमेंट चा पर्याय असणार आहे. त्यावरूनच युजर्स यूपीआयवरून घेवाण-देवाण करू शकणार आहेत. गेल्या आठवड्यात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी तज्ज्ञ व्यक्तींना सांगितले की, WhatsApp Pay ला पुढील सहा महिन्यात अनेक देशात लाँच करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button