पिंपरी / चिंचवड

मशीन ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीतील मशीन ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. ही घटना 18 मे रोजी दुपारी वाघजाईनगर येथील अल्ट्रा कार्पोटेक कंपनीच्या शॉप नंबर 403 मध्ये घडली.

अमोल पिराजी बरडे (वय 29, रा. वाघजाईनगर, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मशीन ऑपरेटर सुशांत निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार विनोद जाधव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत निकम हा अल्ट्रा कार्पोटेक कंपनीत फोर स्टार व्हीएमसी मशीन ऑपरेटरमधून काम करतो. त्याच्या मदतीसाठी कामगार अमोल बरडे हा होता. दोघे मिळून काम करत असताना मशीनच्या आतील लोखंडी फळीवर क्लॅम्पिंगचे अमोल बरडे हा काम करत होता. ऑपरेटर सुशांत याने याची खात्री न करता मशीनमध्ये जॉब लाऊन प्रोग्राम सुरु केला. त्यावेळी मशीनचा धक्का लागून अमोल हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button