पिंपरी / चिंचवड

हिंजवडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

पिंपरी:पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली असून, त्याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलन कुरकुटे असे लाच घेताना पकडलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान आज सायंकाळी तक्रारदार यांच्याकडून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडजोडीकरिता २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. एसीबीने केलेल्या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी लाच कशासाठी घेतली हे समजू शकलेले नाही. मात्र, एसीबीचे एक पथक त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button