पिंपरी / चिंचवड

फ्रेंड्स क्लब जॉईन करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची 96 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

फ्रेंड्स क्लबमध्ये जॉईन करून घेण्याचे सांगत एका 60 वर्षीय व्यक्तीकडून 96 हजार 601 रुपये घेतले आणि त्यांना वेगळ्याच संस्थेचे प्रमाणपत्र पाठवून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सोमवारी (दि. 23) सकाळी साडेदहा ते बुधवारी (दि. 25) दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत देहूरोड येथे घडला.

सुधीरकुमार श्रीरामपरीक्षण ठाकूर (वय 60, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशनी नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना फोन केला. ‘आम्ही फ्रेंड्स क्लब चालवतो. त्यामध्ये व्यायाम, हसणे-खेळणे, वॉकिंग, नवे मित्र-मैत्रीण अशा खूप गोष्टी असतात’ असे सांगून फिर्यादी यांना त्यांचा क्बल जॉईन करण्यास सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून आरोपी महिलेने गुगल पे द्वारे 96 हजार 601 रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना फ्रेंड्स क्लब एवजी ड्रीम नाईट डेटिंग साईट प्रा ली महाराष्ट्र मुंबई 400053 नावाचे प्रमाणपत्र व्हाटसअपवर पाठवून फसवणूक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button