पिंपरी / चिंचवड

कपड्यांच्या गोडाऊन मधून कामगाराने साड्या, गाऊन, कुर्ती, लेगीज असे दोन लाखांचे कपडे चोरले

पिंपरी l प्रतिनिधी

कपड्याच्या दुकानात काम करणा-या कामगाराने त्याच्या साथीदारासोबत मिळून कपड्याच्या गोडाऊनमधून दोन लाख आठ हजार 760 रुपयांचे कपडे चोरले. ही घटना शनिवारी (दि. 5) पहाटे चार ते सकाळी सहा या कालावधीत आंबेडकर चौकाजवळ, रावेत येथे घडली.

श्रवणकुमार तेजाराम चौधरी (वय 43, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुकेश नाथ (वय 30, रा. राजस्थान), गुड्डू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश हा फिर्यादी चौधरी यांच्या दुकानात काम करत होता. त्याने त्याचा मित्र गुड्डू याच्यासोबत मिळून गोडाऊनमधून दोन लाख आठ हजार 760 रुपये किमतीच्या साड्या, गाऊन, कुर्ती, लेगीज अशा प्रकारचे कपडे चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button