breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शिवसेनेला धक्का ; सुलभा उबाळे यांच्या पुतण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

भोसरी – शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. शिरूर महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांचा पुतण्या विशाल उबाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उबाळे यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. त्यामुळे शिरूर मतदारसंघात शिवसेनेची काय स्थिती झाली आहे, यावरून स्पष्ट होत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला एकतर्फी विजय मिळेल आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा सहज खासदार होतील, असे मानले जात होते. राष्ट्रवादीला आधी उमेदवारही मिळत नसल्याची स्थिती होती. त्यातच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेतून आणून राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने आढळराव पाटील हे निश्चितच विजयी होतील, असा राजकीय अंदाज बांधला जात होता. परंतु, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. डॉ. कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराने शिवसेनेला विजय सोपा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादीला मिळणारा प्रतिसाद, या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. सुलभा उबाळे या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान जिल्हा संघटक आहेत. त्याचप्रमाणे त्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या स्टार प्रचारक सुद्धा आहेत. शिरूर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर सुरू असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातीलच व्यक्ती शिवबंधन तोडत असल्याचा संदेश मतदारांमध्ये गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणखीन मजूबत झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button