breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डी. वाय. पाटील विद्यापीठ लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला पुणे जिल्हा न्यायालयाचा अभ्यास दौरा

कायदे सल्लागार ॲड. मंगेश खराबे यांनी केले मार्गदर्शन

पिंपरी: डी. वाय पाटील विद्यापीठ स्कुल ऑफ लॉ ,आंबी तळेगाव येथील कायद्याच्या विद्यार्थ्यांनी केला पुणे जिल्हा न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालयात अभ्यास दौरा ,जिल्हा न्यायालयात वकिली करणारे तसेच डी. वाय पाटील विद्यापीठ स्कुल ऑफ लॉ चे कायदे सल्लागार ॲड. मंगेश खराबे यांनी सदर अभ्यास दौऱ्याबाबतीत जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांची परवानगी घेत या अभ्यास दौऱ्या दरम्यान सर्व कायद्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

फोजदारी न्यायालयाचे वर्ग,न्यायालयांचे अधिकार तसेच दैनंदिन न्यायालयात चालणाऱ्या प्रकरणांबद्दल माहिती देण्यात आली ,सुरुवातीला विद्यार्थ्यांना विभागून काही विद्यार्थ्यांना दिवाणी दावे व प्रक्रिया संदर्भात पाहणी केली तर काही विद्यार्थ्यांना फोजदरी न्यायालयात पाहणी केली, दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी जामीन अर्ज व प्रक्रिया पाहिली तर शेवटी कौटुंबिक न्यायालयातील प्रकरण पाहत अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनसोबत स्कुल ऑफ लॉ चे मुख्याध्यापक डॉ रोहन दास सर, प्राचार्य मयुरी फरकांदे,प्राचार्य एन .अंजली उपस्थित होते.

अँड खराबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना न्यायालयातील निर्णयामागील तर्क समजून घेण्यासाठी खटल्यांचे कायदे वाचण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी न्यायालयीन कार्यवाहीचे तपशीलवार विहंगावलोकन प्रदान केले,कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी, पाठ्यपुस्तके आणि सेमिनार हे मुख्य ज्ञान देतात, परंतु न्यायालयीन कार्यवाही वैयक्तिकरित्या पाहणे एक वेगळा दृष्टीकोन प्रदान करते. वास्तविक वातावरणात न्यायालयामध्ये कायदेशीर तत्त्वांची अंमलबजावणी, युक्तिवाद आणि बचाव कसा केला जातो याचे विद्यार्थ्यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून निरीक्षण केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button