breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: हजला जाण्यासाठी जमा केलेल्या पैश्यांमधून हा शेतमजूर गरिबांना वाटतोय अन्नधान्य

कर्नाटकमधील एका लहानश्या गावामध्ये शेतमजुरी करणाऱ्या अब्दुरेहमान गुद्दीनाबली मागील अनेक वर्षांपासून त्यांचे एक स्वप्न पुर्ण करण्यासाठी पैसे गोळा करत होते. पुढील वर्षी अब्दुरेहमान हज यात्रेला जाण्याचा विचार करत होते. इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हज येथील मक्का येथील मशीदीला  भेट देण्यासाठी ते पैसे जमवत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हे पैसे गरिबांचे पोट भरण्यासाठी वापरणे अधिक महत्वाचे ठरेल असा विचार करुन आता अब्दुलरेहमान यांनी स्वत:चे स्वप्न बाजूला ठेवत या पैशांमधून गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

मंगळूरजवळ असणाऱ्या एका लहानश्या गावात राहणारे ५५ वर्षीय अब्दुरेहमान सध्या गरिबांना किराणाचे सामान पुरवत आहेत.  “कोणत्याही सर्वसामान्य मुस्लीमाप्रमाणे माझ्या वडिलांनाही हज यात्रेला जायचं होतं. ते शेतमजूर आहेत. तर माझी आई बिडी कामगार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते हज यात्रेसाठी पैसे गोळा करत होते. मात्र एकीकडे लोकं उपाशी राहत असताना आपण पैसे गोळा करुन ठेवल्याने आपल्याला पाप लागेल असं त्यांना वाटलं. त्यामुळेच त्यांनी या पैशांमधून गरिबांना अन्नधान्य वाटण्यास सुरुवात केली आहे”, असं अब्दुरेहमानचा मुलगा इलायस सांगतो.

अब्दुरेहमान यांनी आत्तापर्यंत बंटवाल तालुक्यातील गुद्दीनाबली गावातील २५ कुटुंबांना तांदूळ तसेच अन्य किराणा मालाच्या गोष्टींचे वाटप केले आहे. “लॉकडाउनमुळे रोजंदारी बंद झाल्याने लोकांना काम मिळत नसल्याचे पाहून मला त्यांची चिंता वाटू लागली. त्यामुळेच मी जमवलेल्या पैशांमधून अन्नधान्य वाटण्याचा निर्णय घेतला,” असं अब्दुरेहमान सांगतात.

अब्दुरेहमान यांनी हज यात्रेसाठी किती पैसे गोळा केले होते याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अब्दुरेहमान यांनी अन्नधान्य वाटप करण्यासाठी ८० हजार रुपये खर्च केल्याचे एका वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. मुलगा इलियास याने सोशल नेटवर्किंगवर अब्दुरेहमान यांच्या कामाबद्दल टाकलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून अनेकांनी अब्दुरेहमान यांचे कौतुक केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button