breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शहरातील नाल्यांची आयुक्त, पक्षनेत्यांकडून साफसफाईची पाहणी
उर्वरीत नाले साफ करण्याच्या सुचना
पिंपरी – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आज (गुरुवारी) शहरातील नाल्यांची पाहणी केली. यामध्ये लालटोपीनगर, मोहननगर, काळभोर नगर येथील मिल्क बेकरी, निगडीतील भक्ति शक्ती पेट्रोल पंप, कृष्ण मंदिर आणि निगडी चौक या ठिकाणच्या नाल्यांची पाहणी केली.
महापालिका हद्दीत 192 नाले आहेत. नाल्यांची लांबी 99088.84 असून 100 किलोमीटर आहेत. या सर्व नाल्यांची साफसफाई दि. या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आरोग्य विभाग व सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, नालेसफाई महिन्याभरापासून सुरु झाली असून त्याचे काम प्रत्येक प्रभागात सुरु आहे. नालेसफाईसाठी निविदा न काढता सीएसआर फंडातून आणि लोकसहभागातून नालेसफाई केली जात आहे. जिथे निविदा काढण्याची अवशक्ता असेल तिथे स्थापत्याच्या खर्चातून नाल्यांची सफाई केली जाणार आहे. अडचणीच्या नाल्यांसाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहोत. मे अखेरपर्यंत सर्व नाले सफाई पुर्ण केले जाणार असल्याचे पक्षनेते पवार यांनी सांगितले.