breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उत्सुकता वाढली! मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी; कुठे, किती वाजता? वाचा…

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार, ३१ मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार पालिकेने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. मंगळवारी, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत निघणार आहे. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने चार मे रोजी दिलेल्या आदेशात चार आठवड्यांत पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत यंदा नऊ प्रभागांची वाढ होऊन २२७ वरून २३६ प्रभाग झाले आहेत. त्यामुळे यंदा आरक्षणात काही जागांची वाढ होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे.

पालिकेत या आरक्षणात महिला अनुसूचित जाती आणि जमाती व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सहा जूनपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना या कार्यालयात देता येतील. १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. ओबीसी आरक्षणाचा अद्याप तिढा न सुटल्याने ६१ ओबीसी प्रभाग खुले प्रभाग होण्याची तसेच २३६ पैकी ११८ प्रभाग महिलांसाठी असण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित असण्याची शक्यता आहे.

नवीन प्रभाग रचनेतील आरक्षण

खुला प्रवर्ग २१९

अनुसूचित जाती १५

अनुसूचित जमाती २

महिला जागा (५० टक्के आरक्षण)

खुला प्रवर्ग ११८

अनुसूचित जाती १५

अनुसूचित जमाती २

कुठे आणि किती वाजता?

स्थळ : रंगशारदा सभागृह, वांद्रे पश्चिम

दिनांक : ३१ मे २०२२

वेळ : सकाळी ११ वाजता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button