breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘मोस्ट वॉन्टेड’ विधीसंघर्षग्रस्त बालक युनीट 5 च्या पथकाकडून अटक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मोक्का गुन्ह्यात तीन वर्षांपासून तळेगाव पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला अखेर गुन्हे शाखा युनीट 5 कडून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

संबंधीत विधी संघर्षीग्रस्त बालकाला ताब्यात घेण्याचे आदेश युनिट 5 चे वरीष्ठ अधिकारी यांनी दिले होते. त्यावर युनिट पाचच्या पथकाने कोंबीग ऑपरेशन करताना या बालकाला ताब्यात घेण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून हा बालक तळेगाव दाभाडे पोलिसांना पाहिजे होता. पोलीस कर्मचारी सावन राठोड व गणेश मालुसरे यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवून चौकशी केली. तो तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. 417/2017 भादविक 392, 34, आर्म ऍ़क्ट 4(25), 4(27) व मोका कलम 3(1) (ii), 3(4) मध्ये पाहिजे असल्याचे समोर आले. त्यावर त्याला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

यापुर्वी या बालकाने चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. 1080/2018 भादविक 399, 402 हा गुन्हा केल्याचे सुध्दा समोर आले आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे 1 राजाराम पाटील, सहा पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्रीधर जाधव, गुन्हे शाखा, युनिट-5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी सावन राठोड, गणेश मालुसरे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, फारुक मुल्ला, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव, श्यामसुदंर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे व नागेश माळी यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button