breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आयोध्येत दाखल, कोरोना व्हायरसमुळे दौ-यात बदल

मुंबई | महाईन्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत दाखल होणार आहेत. राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी ते पत्रकार परीषद घेणार आहेत. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव विचारात घेता ठाकरे यांच्या दौ-यात काही बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे.

आज होणाऱ्या शिवसेनेच्या दौऱ्यावर मात्र, कोरोना व्हायरसचं सावट स्पष्टपणे दिसून येतंय. कारण, शिवसेनेची नियोजित शरयु नदी महाआरती रद्द करण्यात आली आहे. कारण, कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागांनी लोकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे शरयू महाआरतीसाठी हजारोंच्या संख्येनं होणारी गर्दी आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेची शरयू महाआरतीला परवानगी देण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर त्यांची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर ते  राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखिल उपस्थित असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button