breaking-newsताज्या घडामोडीदेश-विदेश

CRPFची परीक्षा आता होणार मराठीत! गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

CRPF Exam | केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CRPF) कॉन्स्टेबल दलाच्या परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश आहे.

सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (एसएससी) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात.

हेही वाचा    –    अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा करणार का? संजय राऊतांचा खोचक टोला

या भाषांचा समावेश :

मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी.

भरतीबद्दल थोडक्यात :

  • परीक्षेचा कालावधी : २० फेब्रुवारी ते ७ मार्च
  • उमेदवार : ४८ लाख
  • सहभागी शहरे : १२८
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button