breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पाच महिन्यानंतर प्रथमच कोरोना मृतांचा आकडा ३ वर

मुंबई – मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात कोरोना वेगाने नियंत्रणात येत आहे. काल सोमवारी मुंबईत कोरोनाचे फक्त २१८ नवे रुग्ण आढळले. तर एप्रिलनंतर एका दिवसात सर्वात कमी आणि या महिन्यात दुसऱ्यांदा मृतांचा आकडा ३ वर गेला होता. तर सोमवारी ३७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ७,१५,३८९ वर पोहोचली आहे. मुंबईतील सरासरी रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून सोमवारसह तिसऱ्यांदा एका दिवसातील रुग्णसंख्या ३०० पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना चाचणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत आणि मुंबईत आतापर्यंत तब्बल ८४,३९,५२१ नमुने तपासण्यात आले आहेत. २ ते ८ ऑगस्ट या काळात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ ०.०४ टक्के होती. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, झोपडपट्टी आणि चाळ यासारख्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण क्षेत्रांची संख्या घटून केवळ एक झाली आहे. तर,सील केल्या गेलेल्या इमारतींची संख्या ४५ आहे. ४ एप्रिलला मुंबईत सर्वाधिक ११,१६३ आणि १ फेब्रुवारीला सर्वात कमी ३२८ रुग्ण नोंदवले गेले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button