breaking-newsTOP Newsमुंबई

मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • मुंबईत आजही पावसाचा जोर कायम

मुंबई – मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगा’, असे आवाहन जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेत पालकमंत्र्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात असून संपूर्ण राज्यात 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईत गेल्या दोन दिवसापासून सलग जोरदार पाऊस कोसळत आहे. कालच्या दिवसात शहरात घरं पडण्याच्या सहा तक्रारी आल्या, तर झाडं आणि फांदी पडल्याच्या 141 घटना घडल्या. तुफान पावसाने मुंबईची अक्षरशः दाणादाण उडवली. तर रायगड आणि नवी मुंबईतही सोसाट्याचा वारा होता. डी वाय पाटील स्टेडियमचे पत्रे कोसळले, जेएनपीटी बंदरावरील तीन क्रेन कोसळून मोठं नुकसान झालं. खांदा कॉलनी, पनवेल, नवीन पनवेल परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. नवी मुंबईमध्ये 25 ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या.

त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीसह उत्तर कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button