breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पवार साहेबांवर श्रद्धा असलेली महाराष्ट्रातील कोट्यावधी जनता हाच आमचा खरा पक्ष!

शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहर युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर यांचा विश्वास

पिंपरी : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत दिलेल्या निकालाने आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षबाबत जो निकाल दिला होता. तो निकाल पाहता आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही काय निकाल येणार याची संपूर्ण कल्पना होती. मात्र लोकनेते शरद पवार यांच्यासाठी पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी दुय्यम असून त्यांच्यावर नितांत श्रद्धा असलेली महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता हाच पवारसाहेबांचा खरा पक्ष आणि चिन्ह आहे, अशी भावना शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड युवकचे शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर वाद सुरू होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. यासंदर्भात सागर तापकीर यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका; म्हणाले..

पुढे बोलताना सागर तापकीर म्हणाले की, मागील दहा वर्षात केंद्र आणि राज्यातील भाजपने लोकशाही आणि संविधान दोन्हींची जी विटंबना चालवली आहे. त्याचा फटका फक्त देशाच्या राजकारणातील लहान-मोठ्या विरोधी पक्षांनाच नव्हे तर देशातील कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांनाही बसला आहे. पवार साहेब हे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. मात्र निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावाखाली येऊन जो निर्णय दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील सुजाण नागरिकांमध्येही संतापाची लाट आहे. आणि आगामी येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनताच याचा न्यायनिवाडा करेल, असा आम्हाला विश्वासआहे.आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी शरद पवार हा चेहरा आणि नावापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही. पक्ष आणि चिन्ह या गोष्टी तर फार किरकोळ आहे, असे सडेतोड मत तापकीर यांनी यावेळी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button