पिंपरी / चिंचवड

दिघी स्फोट प्रकरणात दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

वडमुखवाडी येथे अलंकापुरम रोडवर गाईच्या गोठ्यात शनिवारी (दि. 5) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास बॉम्ब सदृश वस्तूचा स्फोट झाला. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. तर दोन मुले जखमी झाली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रदीप मारेझोरे चव्हाण (वय 34), गरीबदास बली चव्हाण (वय 35, रा. विश्रांतवाडी रोड, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राधा गोकुळ गवळी (वय 5) हिचा मृत्यू झाला आहे. आरती गोकुळ गवळी (वय 4), राजेश महेश गवळी (वय 4) हे दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई चेतन साळवे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुपारी एवढ्या आकाराची त्यावर धाग्याने गुंडाळलेली बॉम्ब सदृश वस्तू निष्काळजीपणे वापरली. आरोपींनी हयगयीने, जाणूनबुजून या बॉम्ब सदृश वस्तू उघड्यावर टाकून दिल्या. मयत मुलगी राधा तिची लहान बहीण आरती आणि चुलत भाऊ राजेश हे घराजवळ खेळत असताना त्यांना या बॉम्ब सदृश वस्तू आढळल्या. खेळण्याची वस्तू समजून राधाने ती वस्तू हातात घेतली. तिच्यावर दाब पडल्याने वस्तूचा भीषण स्फोट झाला. यात राधाचा मृत्यू झाला तर तिची लहान बहीण आणि चुलत भाऊ जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button