breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

CRIME: समुद्रकिनाऱ्यावर सूटकेसमध्ये सापडले मानवी शरीराचे तुकडे

महाईन्यूज | मुंबई

मुंबईत माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या एका सूटकेसमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. संध्याकाळच्या सुमारास समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या नागरीकांचे किनाऱ्यावर पडलेल्या या सूटकेसवर संशयरित्या लक्ष गेले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.माहिममधील प्रसिद्ध मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागच्या बाजूस ही सूटकेस सापडली. सूटकेसमध्ये काळया रंगाची एका प्लास्टिकची पिशवी होती. त्यामध्ये मानवी शरीराचे हे तुकडे होते. हात आणि पाय कापून सूटकेसमध्ये भरलेले होते. अमेरिकन टुरिस्टर कंपनीची ही सूटकेस असल्याची माहिती समोर आली आहे.

सूटकेसमधील अवयव एकाच व्यक्तीचे नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हात महिलेचा तर पाय पुरुषाचा असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवले आहेत. मृतदेहाचे अन्य तुकडे आसपास सापडण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. यानुसार माहिम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button