breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

भारत-चीनमध्ये आज होऊ शकते जॉइंट सेक्रेटरी लेव्हलची मीटिंग

नवी दिल्ली | भारत-चीन यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी आज दोन्ही देशांमध्ये जॉइंट सेक्रेटरी लेव्हलची बैठक होऊ शकते. मीटिंग झाली तर ती गलवान चकमकीनंतर पहिली डिप्लेमेटिक चर्चा असेल. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये आर्मी अधिकाऱ्यांमध्येच चर्चा होत होती.

यापूर्वी सोमवारी चीन सीमेवर मॉल्डो येथे लेफ्टनंट जनरल लेव्हलची बैठक झाली. यानंतर, मंगळवारी भारतीय सैन्याने सांगितले की, दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यावर सहमती झाली आहे. पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणावरुन दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले होते.लष्कर प्रमुख जनरल एमएम जनरल नरवणे मंगळवारी लडाख येथे दाखल झाले. चीनशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. ते आजही लडाखमध्ये राहतील.विदेशमंत्री एस जयशंकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंगळवारी आरआयसी (रशिया-भारत-चीन) परिषदेत सामील झाले. चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत ते म्हणाले – ‘ही बैठक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांवरील आमच्या विश्वासाची पुनरावृत्ती करते.” आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आणि सर्वांच्या हिताला चालना देणे हाच स्थिर व्यवस्था निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे. ‘

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button