breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १६ प्‍लांट उभारणार

मुंबई – मुंबई महापालिकेने कायमस्‍वरुपी ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी १२ रुग्‍णालयांमध्‍ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे १६ प्‍लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये खर्च इतका अपेक्षित आहे.

इकबाल सिंह चहल म्हणाले की, यासर्व १६ प्रकल्‍पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. या १६ प्रकल्‍पांची निविदा मागविण्यात आल्या असून यामुळे पालिकेची बचत होणार आहे. तसेच . प्राणवायू पुरवठ्याअभावी १६८ कोविड रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागले आहे. ऑक्सिजन उपलब्‍ध करुन देताना होणारी कसरत पाहता पालिकेने रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचे ठरवले आहे. यामुळे ऑक्सिजन उपलब्‍धतेतील अडथळे कमी होतील असे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.हे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे संचालित होवू शकतात. परिणामी महापालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत करण्‍यासाठी देखील हे प्रकल्‍प अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button