breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#COVID19 Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करा, मुंबई विद्यापीठाचे कर्मचाऱ्यांना आवाहन
मुंबई \ महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून सर्वस्तरातून मदत झाली पाहिजे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने याकामी पुढाकार घेतला आसून, आपल्या आस्थापनेवरील सर्व शिक्षक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यासह संलग्न महाविद्यालय, विद्यालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार ‘डोनेट’करावा, असे आवाहन केले आहे.