breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीव्यापार

जगातील आघाडीची अमेरिकन कंपनी हार्ले डेविडसने भारतातून गाशा गुंडाळला

नवी दिल्ली – क्रुझर बाईक बनवणारी जगातील आघाडीची अमेरिकन कंपनी हार्ले डेविडसनने भारतीय बाजारातील आपला गाशा गुंडाळा आहे. सततच्या तोट्यामुळे कंपनीने भारतातील विक्री आणि प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७० कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आलिशान दुचाकी बनवण्यात आघाडीवर असलेल्या हार्ले डेविडसनने १० वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. त्यात त्यांनी देशात विविध ठिकाणी शोरुम, सुट्या भागांची दुकाने आणि सर्व्हिस सेंटर सुरू केली होती. परंतु भारतीय बाजारात त्यांचा जम बसला नाही. कंपनीच्या दुचाकीच्या विक्रीत वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस घटच होत गेली. त्यामुळे होत असलेल्या तोट्यामुळे कंपनीने गुरुवारी भारतातील बाईकची विक्री आणि उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे गुरुग्राम येथील कंपनीचा कारखानाही बंद झाला आहे. हार्ले डेविडसनच्या या निर्णयाचा फायदा आयशर मोटर्सच्या बुलेटला होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button