breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: देशभरातील विमाने सज्ज ठेवण्याचा हवाई दलाचा आदेश
नवी दिल्ली |
कोविड-१९ शी संबंधित कामांसाठी देशभरातील आणि विदेशातील अवजड वाहतूक करणारी आपली सर्व विमाने, तसेच मध्यम वजनाची वाहतूक करणारी पुरेशा संख्येतील विमाने २४ तास सज्ज ठेवण्याचा आदेश भारतीय हवाई दलाने दिला आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी सांगितले.
देशातील सर्व भूप्रदेशांसाठी हवाई दल मोठ्या तसेच मध्यम आकाराची विमाने तैनात करत असल्याचेही भदौरिया यांनी मोदी यांना सांगितल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. भारतीय हवाई दलाने स्थापन केलेल्या ‘कोविड एअर सपोर्ट सेल’बाबतही हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधानांना माहिती दिली.