breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: महाराष्ट्राला पाच लाख अधिक लसमात्रा मिळणार

नवी दिल्ली |

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे लशीच्या १ कोटी मात्रा उपलब्ध असून त्यांना पुढील तीन दिवसात ५७ लाख ७० हजार मात्रा आणखी मिळतील, असे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. वृत्तपत्रातील बातम्यात महाराष्ट्रातील लस संपल्याची माहिती राज्य सरकारच्या हवाल्याने देण्यात आली आहे. त्यावर खुलासा करताना केंद्र सरकारने म्हटले आहे,की महाराष्ट्राकडे २८ एप्रिलच्या सकाळी ८ च्या आकडेवारीनुसार एकूण १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० मात्रा होत्या. त्यातील ०.२२ टक्के वाया गेल्या असून १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे अजून पाच लाख ६ हजार ३१९ मात्रा महाराष्ट्राकडे शिल्लक आहेत. त्यातून पात्र लोकांना लशी देता येतील. महाराष्ट्राला लवकरच आणखी पाच लाख मात्रा देण्यात येत असून त्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना १५ कोटी ९५ लाख ९६ हजार ९४० मात्रा मोफत दिलेल्या आहेत. त्यात वाया गेलेल्या कुप्या धरून १४ कोटी ८९ लाख ७६ हजार २४८ कुप्यांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय पुढील तीन दिवसांत ५७ लाख ७० हजार मात्रा पुरवण्यात येणार आहेत.

कुणाला किती?

* दिल्ली : ३६ लाख ९० हजार ७१० मात्रा दिल्या होत्या, त्यातील ३२ लाख ४३ हजार ३०० मात्रा वापरल्या गेल्या असून अजून ४ लाख ४७ हजार ४१० मात्रा शिल्लक आहेत.

* राजस्थान : १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० मात्रा देण्यात आल्या असून, १ कोटी ३२ लाख २० हजार ३५८ वापरल्या गेल्या आहेत. त्यातील ३ लाख ९२ हजार ००२ मात्रा शिल्लक आहेत.

* उत्तर प्रदेश : १कोटी ३६ लाख ९६ हजार ७८० मात्रा पाठवल्या होत्या, त्यातील १ कोटी २५ लाख ३ हजार ९४३ मात्रा वापरल्या गेल्या तर १२ लाख ९२ हजार ८३७ मात्रा शिल्लक आहेत. त्या राज्याला अजून सात लाख मात्रा पाठवण्यात येतील.

* पश्चिम बंगाल : १ कोटी ९ लाख ८३ हजार ३४० मात्रा पाठवण्यात आल्या होत्या त्यातील १ कोटी ६ लाख ९० हजार ५३२ वापरल्या गेल्या असून, २ लाख ९२ हजार ८०८ मात्रा शिल्लक आहेत. आणखी ४ लाख मात्रा पाठवल्या जाणार आहेत.

* कनार्टक : ९४ लाख ४७ हजार ९०० मात्रा पाठवल्या होत्या, त्यातील ९१ लाख १ हजार २१५ वापरल्या गेल्या. ३ लाख ४६ हजार ६८५ मात्रा शिल्लक असून आणखी चार लाख मात्रा पाठवण्यात येणार आहेत.

* छत्तीसगड : ५९ लाख १६ हजार ५५० मात्रा दिल्या होत्या, त्यातील ५५ लाख ७७ हजार ७८७ वापरल्या गेल्या असून ३ लाख ३८ हजार ९६३ शिल्लक आहेत. आणखी दोन लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.

वाचा-

अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button